
पेण | पेण तालुक्यातील दुरशेत फाटा रस्त्यालगत आज (१० मार्च) एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेची हत्या करुन मृतदेह बॅगेत कोंबण्यात आला आहे. ह्या घटनेने पेणमध्ये खळबळ उडाली आहे.
महिलेची निर्घृण हत्या करुन नंतर तिचा मृतदेह बॅगेत भरुन, ही बॅग पेण तालुक्यातील दुरशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला फेकण्यात आली आहे. या बॅगेतून दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांचे याकडे लक्ष गेले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, साधारण सात दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा अधिक तपस करत आहेत.