रोहा | तालुयातील २६ गावांसाठी तब्बल दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली, पण आजही या गावांमध्ये महिलांना डोयावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. २०१३-१४ मध्ये २१ कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आणि २०२२-२३ मध्ये ३८ कोटी रुपये खर्च करून पुन्हा उन्नती करण्यात आली.
मात्र, प्रत्यक्षात काहीच बदल झाला नाही. विशेषतः दक्षिण खोर्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याचा हक्क असूनही २६ गाव पाण्याच्या थेंबासाठी तडफडत आहेत. या संकटाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) धाटावकडून कुंडलिका नदीत सोडले जाणारे केमिकलयुक्त सांडपाणी हे मुख्य कारण आहे.
याच कुंडलिका नदीवर २६ गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. पण एमआयडीसीच्या उद्योगधंद्यांनी नदीचे पाणी इतके दूषित केले आहे की, ते पिण्यास तर सोडाच, वापरण्यालाही अयोग्य झाले आहे. त्यामुळे या २६ गावांतील नागरिकांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी पाणी हे मोठे संकट बनले आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात वारंवार तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच एमआयडीसी प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या.
मात्र, प्रत्येक विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे आणि प्रत्यक्षात कोणीही ठोस कारवाई करत नाही. इतया कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही जर पाणी मिळत नसेल, तर हाच पैसा नेमका कुठे गेला, असा संतप्त प्रश्न आता ग्रामस्थ महिलांनी उपस्थित केला आहे. तथाकथित पाणीपुरवठा योजना असूनही रोहा नगरपरिषदेच्या अनधिकृत टॅप कनेशनमुळे अनेक गावांतील पाणी गायब होते. त्याचा फटका विशेषतः दक्षिण खोर्यातील गावांना बसतो, जिथे आता पाणी पुरवठा पूर्णतः बंदच झाला आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे गावकर्यांमध्ये तीव्र रोष आहे.