खोपोली | चित्रपटामध्ये पोलीस उशिरा पोहचणे, ऐकून न घेणे, ऐकूण घेतल्यावर उलटच करणे अशी नागरिकांची धारणा आहे. याविरुद्ध रायगड पोलीस दल काम करते, अशा शब्दांत विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी रायगड पोलिसांचे कौतुक केले आहे.
खालापूर पोलीस ठाण्यापासून जवळपास १२ किमी अंतरावर इंसाबा येथे औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकी सुरू करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, इसांबे सरपंच हिरामण हिलम, खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, रसायनी पोलीस ठाण्याचे संजय बांगर उपस्थित होते.