नवीन पनवेल | पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटनेच्या सदस्यांना तुकाराम बीजचे औचित्य साधून अपघात विम्याचे वाटप १६ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे सत्य संस्कृती चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन जोशी, नीरज पांडे, ललित सिंग मेहता उपस्थित होते. पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयुर तांबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि गतवर्षी राबवलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली.