खोपोली | खालापुर तालुयात अनेक जल जीवन पाणी योजनेचे काम मार्च महिना अखेरीस सुरू असून काही जल जीवन मिशन पाणी योजनेचे काम बंद असल्याने संबंधित ठेकेदांराच्या विरोधात ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असून ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील खरसुंडी येथील जल जीवन पाणीपुरवठा योजनेच काम गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने या ठिकाणी नागरिकांना ऐन एप्रिल व मे महिन्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून या ठिकाणचा ठेकेदार जोमात असून जल जीवन पाणीपुरवठा योजना कोमात गेल्याचे ठेकेदाराच्या कामावरून पहावयास मिळत आहे.
खालापूर तालुयात ९२ जलजीवन मिशन योजना मंजूर झाल्या आहेत, यातील २५ योजना पूर्णत्वास आल्याची माहिती शासकीय स्तरावर मिळाली असून आणखी काही योजनाचे काम प्रगतीपथावर असल्याचे मार्च महिना अखेरीस पाहायला मिळत आहे काही योजनांचे काम ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून ठेकेदाराच्या याच मनमानी कारभारामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार यात शंका नाही.
तालुयातील काही जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनांचे काम ठप्प असताना यातील कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील कुंभिवली गाव पाणीपुरवठा योजना बंद असताना याच ग्रामपंचायत हद्दीतील खरसुंडी गावातील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना गेल्या काही महिन्यापासून बंद अवस्थेत असून टाकीचे काम करण्यासाठी लावण्यात आलेले बांबू कुजून गेल्याने या ठिकाणचं काम किती महिने बंद असेल यावरून ठेकेदाराचा मनमानी कारभार समोर येत आहे, संबंधित ठेकेदारांना अधिकार्यांचे अभय असल्याने ठेकेदार ’हम करे सो कायदा’प्रमाणे काम करीत असल्याचे या ठिकाणच्या कामावरून पहावयास मिळत आहे.
तर याठिकाणी जल जीवन पाणीपुरवठा योजनेसाठी ६८ लाख ९७ हजार ४४१ रुपये इतका निधी मंजूर झाला असून हे काम प्रेरणा इंटरप्राईजेस या ठेकेदारास देण्यात आले आहे. तर या ठेकेदाराने अर्धवट काम करत २४ लाख १७ हजार ६२० रुपयांचा बिल काढून घेतला आहे.
सध्या परिस्थितीत गावात पाईपलाईन फिरवण्यात आली आहे, परंतु पाईपलाईन फिरवताना योग्य प्रकारे खोदकाम न केल्याने काही ठिकाणी पाईपलाईनचे पाईप वरती आले आहेत त्याचबरोबर टाकीचे काम अर्धवट अवस्थेत असून टाकीसाठी लावण्यात आलेले बांबू कुजलेल्या अवस्थेत असल्याने बांबू कोसळून या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शयता वर्तवली जात असून दिलेल्या इस्टिमेटनुसार ठेकेदार काम करत नसल्याचे त्याच्या कामावरून पहावयास मिळत आहे. त्यामुळे अशा मनमानी कारभार करणार्या ठेकेदारांना संबंधित अधिकार्यांचे अभय असल्याचे प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ देत आहेत.