कोलाड | सुकेळी खिंडीत तीव्र उतारावर ट्रेलर पलटी , वाहनचालक आत अडकून गंभीर जखमी

18 Mar 2025 16:46:50
 roha
 
कोलाड | मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील सुकेळी खिंडीत तीव्र उतारावर दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना वरील नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी ट्रेलर क्रमांक एम एच ४३, बी.जी. ६८३७ या क्रमांकांच्या ट्रेलरवर ताबा सुटल्यामुळे गाडी डिव्हायडरला धडकून टेलर पलटी झाला.
 
या अपघातात ट्रेलर चालक नितीन कुमार यादव, वय वर्षे २५, राहणार लखनऊ-उत्तरप्रदेश हा केबिनमध्ये अडकून त्याच्या पायाला हाताला गंभीर दुखपत झाली. क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून त्याला उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेळी येथे हलविण्यात आले असून सदर वाहतूक दोन्ही साईडच्या लेनद्वारे सुरळीत सुरु करण्यात आली. अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि जी.बी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0