पनवेल | १४ शाळांचे विज बिल थकल्याने कनेशन तोडले

By Raigad Times    18-Mar-2025
Total Views |
 panvel
 
नवीन पनवेल | विज बिल थकल्याने पनवेल तालुयातील १४ शाळांचे कनेशन तोडण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. शिक्षण विभागाने यावर वेळीच तोडगा काढायला हवा. तालुयात जिल्हा परिषदेच्या २४६ शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
तालुयातील सागाची वाडी, धामणी, टावरवाडी, कोंबलटेकडी, देहंरंग, खैरवाडी, शिरवली, आंबे तर्फे तळोजे, कुत्तरपाडा, करंबेळी तर्फे तळोजे, कोंडप, मोसारे, पाटनोली, नानोशी या चौदा शाळांचे विज बिल थकल्याने कनेशन तोडण्यात आले आहे. हे थकित बिल कोणी भरायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्याने याकडे दुर्लक्ष करत आहेत. रायगड जिल्हा परिषदेचा कारभार सध्या प्रशासक पाहत असून तालुयातील काही ग्रामपंचायतीचा कारभार देखील प्रशासकांच्या हाती आहे. शिक्षण विभागासह ग्रामपंचायत विज बिल भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. मात्र शाळेत विज नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. सागाची वाडी येथे मीटर उपलब्ध नसून शेजारील घरातून विद्युत सुविधा पुरविण्यात येत आहे.
 
धामणी येथील थकीत रक्कम भरणेबाबत ग्रामपंचायतकडे पाठपुरावा सुरू आहे. टावरवाडी येथे सोलर विद्युत सुविधेतून अंशतः सुरू आहे. कुंबलटेकडी येथे फेब्रुवारी अखेर थकीत रक्कम बाकी आहे. शिरवली आणि आंबे तर्फे तळोजा येथे बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा सुरू आहे.
 
कुत्तरपाडा येथील वीज मीटर कापण्यात आले आहे. खैरवाडी येथे महावितरणकडे नवीन कनेशनसाठी अर्ज करण्यात आला आहे. देहरंग आणि करंबेळी तर्फे तळोजा येथील मीटर काढून नेण्यात आले. कोंडप येथील वीज मीटर कट केले आहे. मोसारे, पाटणोली, नानोशी येथे वीज मीटर साठी आवश्यक रक्कम भरणा केली आहे अशी माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.