रीलबाज अधिकारी, पोलिसांवर कारवाई होणार- मुख्यमंत्री

By Raigad Times    20-Mar-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | सरकारी अधिकारी-कर्मचारी रिल्स प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. याप्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील ३ महिन्यांत यासंदर्भात धोरण निश्चित केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. बेशिस्त वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
 
अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रिल्सटाकतात. त्यामुळे राज्य तेच चालवतात असा भास होतो. यासंदर्भात कडक नियम आणि कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असा प्रश्न आमदार परिणय फुके यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. यासंदर्भात कडक नियम तयार करण्याची गरज आहे. सरकारी सेवा शर्तीचे नियम १९८९ चे आहेत.
 
नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणुकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणूकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील. डिटेल जीआर यासंदर्भात केलं जाईल. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाही असे मी आश्वासित करतो. पुढील तीन महिन्यात यासंदर्भात आम्ही धोरण निश्चित करू, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.