औरंगजेबाची कबर न हटविल्यास कारसेवा करण्याचा विहिंपचा निर्धार

By Raigad Times    21-Mar-2025
Total Views |
 Murud
 
मुरुड जंजिरा | उझबेगी परकीय आक्रमक बाबर वंशज औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी नगर या शहरातून काढून टाकावी, असे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विेश हिंदू परिषद व बजरंग दल मुरुड प्रखंडा मार्फत मुरुड तहसिलदार रोहन शिंदे यांच्याकडे दि. १८ मार्च रोजी देण्यात आले आहे.
 
सदर निवेदनात औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही स्वतंत्र भारतात असणे हे गुलामीचे तथा अनंत यातनांचे प्रतिक असल्याचे म्हटले असून परकीयांचे कुठलेही नामोनिशाण नष्ट झाले पाहिजे तरी सदर कबर पूर्णपणे काढून टाकावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
 
हे न झाल्यास पूर्वसूचित करून विेश हिंदू परिषद व बजरंग दल हिंदू समाजा सोबत छत्रपती संभाजी नगरकडे कारसेवेसाठी कूच करेल व कबर उद्ध्वस्त करेल असा गर्भित इशाराही दिला आहे. सदर निवेदन विहिंप कार्यकर्ते संतोष भोईर, नारायण घाग व विहिप बजरंग दल कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना सादर केले आहे.