नेरळ-माथेरान मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्यात यावी , खा. श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

By Raigad Times    22-Mar-2025
Total Views |
 KARJT
 
माथेरान | पर्यटकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान मिनी ट्रेनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
 
त्यानुसार दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेरळ माथेरान मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्यात यावी हा महत्वाचा प्रश्न मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार संसदरत्न श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लवकरच आगामी काळात याठिकाणी पर्यटकांसाठी माथेरान मिनीट्रेनच्या फेर्‍यांमध्ये वाढ होण्याची शयता नागरिकांना तसेच पर्यटकांना वाटत आहे.