महाड इसाने कांबळे येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

24 Mar 2025 17:58:36
 mahad
 
पोलादपूर | महाड तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील इसाने कांबळे येथून शनिवारी, २२ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कोणी तरी अज्ञात इसमाने दोन अल्पवयीन मुलींना फिर्यादीच्या आई वडिलांच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले असून दोन्ही अल्पवयीन मुली या सख्ख्या बहिणी असल्याची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.
 
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींची नावे अमृता अनिल गायकर (वय वर्ष १७) व नम्रता अनिल गायकर (वय वर्ष १६) असे असून त्या मुळच्या राहणार कात्रज जांभूळवाडी रोड हनुमान नगर येथील आहेत पळवून नेणार्‍या अज्ञात इसमा विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुर्वे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0