बोडणी घाटात अपघात; ट्रेलर जळून खाक

28 Mar 2025 20:29:44
 shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरापासून जवळच असलेल्या श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणी घाटातील उतारावर श्रीवर्धनकडे येणार्‍या ट्रेलरला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर अचानक ट्रेलरने पेट घेतला. सुदैवाने चालक व क्लीनर वेळीच बाहेर पडले. मात्र ट्रेलर जळून खाक झाला आहे. या ट्रेलरमध्ये कन्ट्रक्शनसाठी लागणारे लोखंडी स्टील होते.
 
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर चालक व क्लीनर दोघेही सुखरूप बाहेर पडले. नंतर ट्रेलरने पेट घेतला व ट्रेलर आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाला. परिसरामध्येसुद्धा सुके गवत असल्याने आगीने मोर्चा वळविला होता.
 
आग विझविण्यासाठी श्रीवर्धन नगरपरिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. परंतु आग आटोक्यात येत नव्हती. आग एवढी भयानक होती की आग विझवण्यासाठी तीन बंबांची आवश्यकता लागली. घटनास्थळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी दाखल झाले होते. त्यांच्याकडून पचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
 
 
Powered By Sangraha 9.0