महाड | महाड एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील नडगांव गावाच्या हद्दीतून एका कुख्यात नक्षलवाद्याला जेरबंद करण्यात आले आहे. बिहार पोलिसाचा स्पेशल टास्क फोर्सने महाड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेला नक्षलवादी महाड एमआयडीसी परिसरात मजूर म्हणून काम करित होता.
बिहारमध्ये त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो महाड येथे वास्तव्यास असल्याची माहिती बिहार एसटीएफला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बिहार एसटीएफचे पथक महाडला आले.
या पथकाने महाड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने २७ आणि २८ मार्चच्या मध्यरात्री तो राहत असलेल्या नडगांव काळभैरव नगर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. या नक्षलवाद्याचे नाव किंवा अन्य माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला.