पेण | पेण पोलीस ठाणे हद्दीतील काश्मिरे गावात वारंवार घरपोडी चोर्या करून अज्ञात चोराकडून हैदोस घालण्यात आला होता. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. नुकतेच पेण पोलिसांनी गुड्डू नामक चोरास शिताफीतीने पकडून अटक केली आहे. ऑनलाईन रम्मी खेळायचे नाद लागलेल्या काश्मीरे गावातील आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे वय २७ वर्षे, रा.काश्मिरे, पो.कांदळेपाडा याला अटक करण्यात आली होती.
त्याला पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने पेण पोलीस स्टेशन हद्दीत अजून ४ गुन्हे केल्याचे कबुल केले. सदर गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समद बेग, राजेश पाटील, राजेंद्र भोंडकर, प्रकाश कोकरे, अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे, संतोष जाधव, सुशांत भोईर यांनी कौशल्यपुर्ण तपास करून यश मिळवल्याने सर्व स्तरातून पेण पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.