पाणी व स्वच्छतेसाठी कार्य करणार्‍या महिलांचा करण्यात येणार सन्मान

06 Mar 2025 13:38:37
 alibag
 
अलिबाग | जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे पाणी, स्वच्छता, आरोग्य संबंधित उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या महिलांना प्रेरणा देण्यासाठी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
 
८ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला सभेचे आयोजन केले आहे. सदर दिवशी ग्रामपंचायतीमध्ये पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणार्‍या अडी अडचणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे. पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0