रोहा | तालुक्यातील धामणसई येथील इंदरदेव धनगरवाड्यात लागलेल्या भीषण वणव्याने ४८ घरे जळून खाक झाली आहेत. ही आग गुरुवारी (६ मार्च) ५ वाजण्याच्या सुमारास लागली.
सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड आणि एस.व्ही.आर. एस बचाव पथक घटनास्थळी दाखल होत, आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यात मदत केले. अखेर अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात यश आले. दरम्यान, या वणव्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.