होळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार?

07 Mar 2025 19:58:29
 alibag
 
मुंबई | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचार्‍यांच्या विविध आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाची दखल एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.
 
त्यामुळे ऐन होळीत एसटी प्रवाशांचा प्रवास रखडणार आहे. होळीच्या सणात एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता असल्यामुळे होळीनिमित्त गावी जाणार्‍या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
ऐन होळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्‍यांच्या या निर्णयामुळे आता एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0