अंगणवाडी सेविका, मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता मंजूर

08 Mar 2025 16:04:26
 alibag
 
अलिबाग | महाराष्ट्र राज्यात महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांचे अर्ज नारी शक्ती दूत अ‍ॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टल वरून भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना देण्यात आली होती.
 
यानुसार रायगड जिल्ह्यासाठी रु.१ कोटी १४ लाख ८३ हजार ९०० इतके अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रायगड-अलिबाग सुहिता ओव्हाळ यांनी दिली आहे. आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना एकूण रु.१ कोटी १४ लाख ८३ हजार ९०० रुपयांचे प्रोत्साहन भत्त्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
 
अंगणवाडी सेविका यांनी नारी शक्ती दूत अ‍ॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टलवर यशस्वीपणे नोंदवलेल्या २ लाख २९ हाजर १८४ अर्जांवर आधारित रु.५० प्रति अर्जप्रमाणे रु.१ लाख १४ लाख ५९ हजार २०० अनुदान मंजूर, मुख्य सेविकांनी नोंदवलेल्या ४९४ अर्जांवर आधारित रु.५० प्रति अर्ज प्रमाणे रु.२४ हजार ७०० अनुदान मंजूर.
 
हे अनुदान तालुकानिहाय बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/ नागरी) यांच्या डीडीओ खात्यावर वर्ग करण्यात आले असून, जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांच्या खात्यावर हे भत्ते वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.
 
Powered By Sangraha 9.0