भैय्या जोशींच्या वक्तव्याचा पेण शिवसेनेकडून निषेध

08 Mar 2025 17:53:29
 pen
 
पेण | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्या जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत शुक्रवारी (७ मार्च) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पेणच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून पेण नगरपालिका नाक्यावर निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली.
 
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, जिल्हा सह समन्वयक समीर म्हात्रे, विनोद म्हात्रे, जगदीश ठाकूर, शहर प्रमुख सुहास पाटील, महिला शहर प्रमुख मेघना चव्हाण, हिराजी चोगले, तुकाराम म्हात्रे, महेश पोरे, योगेश पाटील, वैशाली समेळ, राजश्री घरत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
 
मुंबईमध्ये येणार्‍यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणार्‍या भैय्या जोशी यांच्या या वक्तव्याचा पेण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0