पेणः लिफ्ट कोसळून अपघात, २ जखमी

By Raigad Times    02-Apr-2025
Total Views |
 pen
 
पेण | इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन फक्त दीड वर्षे झालेल्या पेण येथील एका इमारतीची लिफ्ट कोसळून अपघात झाला. या अपघातात दोनजण जखमी झाले आहेत. लिफ्टचे ऑडिट न झाल्याने हा अपघात झाल्याची तक्रार येथीलनागरिकांनी केली आहे. पेण शहरातील प्राईड सिटी या सात मजली इमारतीमधील लिफ्ट अचानक ब्रेक फेल झाल्याने जोरात आदळली.
 
या इमारतीमध्ये जवळजवळ २३५ सदनिका धारक आहेत. इमारतीचा ताबा घेतल्यापासून येथील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे लिफ्ट निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रारसुद्धा केली होती. मात्र, बिल्डरने दुर्लक्षित केल्यामुळ या लिफ्ट दुर्घटनेला सामोरे जावे लागले असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
 
या अपघातात दोन जखमी झालेल्या व्यक्तींना पेणमधील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामधील दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून सोसायटीतील नागरिक आक्रमक झाले आहेत.