ग्राहकाचे पावणेदहा लाख घेऊन खेळला ऑनलाईन जुगार! स्कोडा कार शोरुममधील कर्मचार्‍याचा प्रताप

02 Apr 2025 20:25:18
panvel
 
पनवेल | गाडी खरेदीसाठी ग्राहकाने दिलेले पैसे जमा न करता, शोरुममधील कर्मचार्‍याने ते पैसे ऑनलाईन जुगारात लावल्याचा धक्कादायक प्रकार पनवेमध्ये उघडकीस आला आहे. स्कोडा कार शोरुममध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
स्वप्नील क्षीरसागर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी गारनेट मोटर्स पनवेल या स्कोडा कारच्या शोरुममध्ये सेल्स एझियुटीव्ह म्हणून काम पाहणारा सागर चव्हाण याला स्कोडा कुशाक गाडी खरेदीकरिता जवळपास ९ लाख ७० हजार ६९९ रुपये जमा करण्यास दिले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0