रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेहा भोसले

03 Apr 2025 19:34:47
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची पदोन्नतीने नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी सदर आदेश पारित केले आहेत.
 
बुधवारी (२ एप्रिल) नेहा भोसले यांनी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याकडून रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. डॉ. भरत बास्टेवाड यांनी जुलै २०२३ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली होती.
 
डॉ. भरत बास्टेवाड शासनाच्या विविध योजना उत्तमरित्या राबविल्या. दिव्यांग व महिला बचत गटांना १०० टक्के अनुदानातून व्यवसायासाठी फिरते वाहन उपलब्ध करून देत, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. तसेच प्रशासन गतिमान केले. डॉ. भरत बास्टेवाड यांची पदोन्नतीने नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. भरत बास्टेवाड यांच्या जागी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहा भोसले यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेत १५वी रँक मिळवली होती. त्या यापूर्वी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
 
 
Powered By Sangraha 9.0