उरण | उरण तालुक्यात वातावरण काहीसे ढगाळ असताना शुक्रवारी (४ एप्रिल) दुपारी अचानक चिरनेर, दिघाटी, साई, कळंबुसरे, मोठे भोम परिसरात धुळीचे वादळ निर्माण झाले होते.
हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण पसरल्याने रस्त्यावरुन चालताना नागरिकांना, वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यातच इंद्रायणी डोंगरमाथ्यावर श्री एकवीरा देवीचा उत्सव सोहळा उत्साहात पार पडत असताना मंदिराजवळ उभारण्यात आलेला मंडप वादळी वार्यात कोसळला. सुदैवाने भाविक थोडक्यात बचावले आहेत.