नवीन पनवेल | चिखले येथील शासकीय जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण ग्रामपंचायतच्या वतीने ४ एप्रिल रोजी जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाई दरम्यान शासकीय कर्मचारी, ग्रामसेविका उपस्थित होते.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी चिखले ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह एकूण १३ जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ एप्रिल रोजी चिखले येथील सर्वे नंबर ३३ या शासकीय जागेवर तात्पुरत्या स्वरूपात ८० बांबूच्या कच्च्या अतिक्रमण झाल्याचे प्रत्यक्ष जागेवर दिसत होते.
हे अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. यासाठी चार मजूर, चार ग्रामपंचायत कर्मचारी, एक घंटागाडी यांच्या सहाय्याने झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी जवळपास ५०० बांबू जप्त करण्यात आले.