पनवेल | दोन दुचाकी आणि रिक्षामध्ये झालेल्या विचित्र अपघात दुचाकी पुलावरुन तीस फूट खाली कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल-तारा गावाच्या हद्दीत पेणकडून एक चारचाकी विरुद्ध दिशेने अतिवेगाने पनवेलच्या दिशेने जात होती.
यावेळी पनवेलकडून पेणच्या दिशेने येत असलेल्या दोन मोटरसायकलसह एका रिक्षाला या कारने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यातील एक मोटारसायकल दोन प्रवाशांसह एक चिमुकली पुलावरुन सुमारे ३० फूट खाली कोसळली. तीनही जखमींना पनवेल येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
यामध्ये आदिती सिंग (२८) हिचा मृत्यू झाला आहे. तर गौरी खैरनार (१०), सलमान शहा (२७) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.