रायगड : ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षणासाठी तालुक्यातील सभेच्या तारखा ठरल्या...

08 Apr 2025 18:03:11
RAIGAD COLLECTOR KISHAN JAWALE
 
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींसाठी 2025-2030 साठी तालुकानिहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत व नियुक्ती करुन आणि सरपंच आरक्षणाची तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
 
मुकेश चव्हाण,उपविभागीय अधिकारी अलिबाग-अलिबाग व मुरुड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख अलिबाग - 22 एप्रिल 2025, मुरुड- 23 एप्रिल 2025.
 
श्री.प्रविण पवार उपविभागीय अधिकारी पेण-सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख दिनांक 22 एप्रिल 2025.
 
श्री.पवन चांडक उपविभागीयअधिकारी पनवेल- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख पनवेल तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, उरण तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
 
श्री.प्रकाश संकपाळ उपविभागीय अधिकारी कर्जत- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख कर्जत तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, खालापूर तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
 
श्री.ज्ञानेश्वर खुटवड उपविभागीय अधिकारी रोहा- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख रोहा तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, सुधागड तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
 
श्री.संदीपान सानप उपविभागीय अधिकारी माणगाव-सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख माणगाव तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, तळा तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
 
श्री.प्रविण पवार उपविभागीय अधिकारी पेण- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख महाड तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
 
श्री.संदीपान सानप उपविभागीय अधिकारी माणगाव- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख पोलादपूर तालुका दिनांक 24 एप्रिल 2025.
 
श्री.महेश पाटील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख श्रीवर्धन तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, म्हसळा तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
 
उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964पोट नियम (4) (5) (6) नुसार त्या-त्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या, मागील आरक्षण यांचा सखोल अभ्यास करुन अचूक आरक्षण निश्चित करावे. सरपंथ आरक्षणाची सभा संबंधित तालुक्यात घेऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0