रेल्वेची धडक;तरुणाचा मृत्यू

08 Apr 2025 19:24:16
 mangoan
 
माणगाव | रेल्वेची धडक लागून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माणगाव तालुक्यात घडली आहे. रविवारी, ६ एप्रिल रोजी रात्री २.४२ वाजता संपर्क क्रांती रेल्वे इंदापूर जवळ आली असता, सचिन कृष्णा मुंढे याला ठोकर (वय ३० वर्ष, रा. कशेणे) लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
 
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0