डोणवत येथील एमएनएस कंपनीत आग

09 Apr 2025 12:49:49
 khopoli
 
खोपोली | डोणवत येथील पोलाद उत्पादन करणार्‍या एम एन एस स्टील (जुन्या उत्तम स्टील) कारखान्यात अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
 
सुदैवाने आगीत मोठी हानी झाली नसल्याचे समजते. एम एन एस स्टील कंपनीत फायरचे पत्रे बदलण्याचे काम सुरू असताना फायबरच्या पत्र्यांना वेल्डिंग तसेच उष्ण तापमानामुळे अचानक आग लागली.
 
धुराचे लोंड पसरल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दल आणि अपघातग्रस्त टिम पोहचल्यानंतर आग विझविण्याचे काम केले आहे.
Powered By Sangraha 9.0