सुधागड-पाली | पालीतील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक वर्षांपासून फिल्टर योजनेचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र, ही योजना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरली आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांनी फिल्टर योजनेचा राजकीय लाभ मिळवला, पण प्रत्यक्षात ही योजना फक्त ओशासनांपुरती मर्यादित राहिली.
पालीकरांना फिल्टर योजनेचे ओशासन देऊन त्यांच्या विेशासाचा गैरवापर केला गेला. निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांनी या योजनेचा उल्लेख वारंवार केला, परंतु प्रत्यक्षात ही योजना कागदावरच राहिली. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या म्हणीप्रमाणे नागरिकांना स्वच्छ पाण्याचे स्वप्न दाखवले गेले, पण ते प्रत्यक्षात साकार झाले नाही. पालीतील नागरिकांन पावसाळ्यात गढूळ आणि दूषित पाणी प्यावे लागत आहे.
शुद्ध पाणी मिळण्याची त्यांची प्राथमिक गरज आजही अपूर्ण आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत, परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. फिल्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. पालीतील नागरिकांना त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीनी लक्ष देणे आवश्यक आहे. शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.