कर्जतमधील कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या माजी नगरसेवकाचे हृदयविकाराने निधन

0
338

संतोष पेरणे/कर्जत : कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश म्हसकर यांचे रविवारी (26 जुलै) निधन झाले. त्यांचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तो धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी नगरसेवक ब हे पाच-सहा दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यानंतर ते कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आली हे कळाल्यावर त्यांना धक्का बसला व त्यांची तब्येत एकदम बिघडली. शनिवारी पुढील उपचारासाठी त्यांना डी.वाय.पाटील रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचार करीत असताना काल रविवारी दुपारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

गणेश म्हसकर हे सुरुवातीला थोडे दिवस पत्रकारिता करीत होते. त्यानंतर त्यांनी शेकापचे कार्यकर्ता म्हणून काम केले. कालांतराने त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2004 ची नगरपरिषदेची निवडणुकीत लढवली आणि ते निवडूनही आले. त्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसायात लक्ष घातले. त्यातही ते नावारुपाला आले. कोंकण ज्ञानपीठ कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे ते स्थनिक व्यवस्थापन समिती सदस्य होते. अनेक संस्थांवरसुद्धा ते कार्यरत होते.

गणेश म्हसकर यांचे काल निधन झाले. निधनसमयी ते 46 वर्षांचे होते. एक हुशार व मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत त्यांच्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here