भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनाला परवानगी द्या- श्री संत वारकरी संप्रदाय

0
254

श्री संत वारकरी संप्रदाय सुधागड यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

गौसखान पठाण / सुधागड-पाली ः कोरोनाची महामारी असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र काही नियम व अटी घालून भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तनाला परवानगी द्यावी असे निवेदन श्री संत वारकरी संप्रदाय व भजनी मंडळ सुधागड यांच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटात वारकरी संप्रदायानेसुद्धा शासनास सहकार्य केले आहे. पायी वारीची परंपरा खंडित झालेले आहे. वारकरी संप्रदायाचे सुद्धा पारंपारिक भजन, कीर्तन, प्रवचन हे कार्यक्रम बंद आहेत. मात्र आता बाजारपेठा व इतर गोष्टींना काही नियम अटी घालून दिल्या आणि त्याचे पालन करीत काही प्रमाणात बाजारपेठ मोल,दुकाने सुरू झाली दारूची दुकाने सुद्धा सुरू झाली. भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन हे कार्यक्रम सुरू झालेले नाही.

आम्हाला काही नियम व अटी सहीत गावोगावी आणि शहरी भागांमध्ये जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. अशा ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन ,या कार्यक्रमाला भजनाला आठ ते दहा लोकांची परवानगी तसेच प्रवचन करता 20 ते 25 लोकांची परवानगी द्यावी असे निवेदन श्री संत वारकरी संप्रदाय व भजनी मंडळ सुधागड जिल्हा रायगड यांच्यावतीने सुधागड तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

यावेळी ह.भ.प.गणेश(बुवा) नेताजी देशमुख, रायगड भूषण भजन सम्राट मराठा महासंघ तालुका अध्यक्ष सुधागड यांच्यासह ह.भ.प. प्रमोद महाजन राठोड ,युवा कीर्तनकार ह. भ. प. अमृत महाराज मोरे ,युवा कीर्तनकार सुधीर महाराज पातेरे, युवा कीर्तनकार ह. भ.प. किरण महाराज कुंभार, रायगड भूषण ह. भ. प. महेश महाराज देशमुख, युवा कीर्तनकार ह. भ .प. निलेश महाराज साठे, कीर्तनकार ह.भ.प. दिलीप महाराज देशमुख, युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रशांत महाराज दळवी, ह.भ.प.नरेश सुतार, युवा कीर्तनकार ह.भ.प. सतीश महाराज खाडे, ह.भ.प. गोविंद ठाकूर,यांच्यासह भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here