रायगडकरांना दिलासा देणारी बातमी…जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू तपासणी यंत्रणेसह प्रयोगशाळेला मंजुरी

0
4513
  • जिल्हास्तरावरच मिळणार स्वॅब टेस्टींग रिपोर्ट

  • पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश

अलिबाग : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, रायगडकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. रायगड जिल्ह्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू तपासणी यंत्रणेसह प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रायगडकरांना आता कोरोना स्वॅब तपासणीकरिता जिल्ह्याबाहेर जाण्याची तसेच रिपोर्टकरिता प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही.

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातच आता करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (9 जुलै) शासनाने निर्गमित केला आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खाजगी उपक्रम यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार अ

जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे प्रयोगशाळा मंजुरीचे हे यश प्राप्त झाले आहे. या लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब टेस्टींग रिपोर्ट जिल्हास्तरावरच वेळेत मिळण्यासाठी उपयोग होणार आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा रूग्णालय येथे ही लॅब मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला होता. आज त्यास यश मिळाले असून यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही लॅब मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here