आयुष डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दुर करा – नवी मुंबईतील डाॅक्टरांची मागणी

0
154
नवी मुंबई : आयुर्वेद व होमिओपॅथी या दोन्ही पॅथी आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहीरातीमधे मात्र आयुर्वेद व होमिओपॅथिक डाॅक्टरांना देण्यात येणाऱ्या मानधनात तफावत दिसुन आल्यानंतर,हिम्पाम’ महाराष्ट्राचे अध्यक्ष डाॅ.एस.टी.गोसावी व सहसचिव तथा हिम्पाम नवी मुंबईचे अध्यक्ष डाॅ. प्रतिक तांबे यांच्या नेत्रुत्वाखाली होमिओपॅथिक डाॅक्टरांच्या संघटनेने आयुक्त  अभिजीत बांगर यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली व  आयुष डाॅक्टरांना समान वेतन मिळावे असे निवेदन देण्यात आले.
नवी मुंबई मधील विविध कॉव्हिड उपचार केंद्रामधे आयुष डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्या असून त्यांच्या चांगल्या कामांची नगरपालिका दखल घेत आहे ही आयुष डॉक्टरांसाठी अतिशय उत्साहवर्धक बाब आहे परंतू मानधनातील तफावतीमुळे होमिओपॅथीक डाॅक्टरांवर होणारा दुजाभाव व त्यामुळे तेथे काम करणार्या व काम करण्यास इश्चुक डाॅक्टरांच्या मनातील संभ्रम दुर करावा असेही या शिष्टमंडळाने सांगीतले. यावेळी मानधनातील तफावतीबरोबरच
कोव्हीड रुग्णालयातील आयुष डाॅक्टरांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत चर्चा केली.
आयुष डॉक्टरांची तात्पुरती नियुक्ती फक्त CCC साठी झाली होती.पण *आयुष* डॉक्टरांचे वैद्यकीय कौशल्य आणि ज्ञान बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर DCHC ची जबाबदारीही टाकली आहे, त्यामुळे त्यांची रिस्कही वाढली आहे तसेच ती जबाबदारी आयुष डॉक्टर उत्तमरीत्या सांभाळत  आहेतच, तरीही त्यांच्या मानधनामध्ये खूप तफावत ठेऊन त्याच्या बरोबर भेदभाव कोणत्या निकषांच्या आधारे केला जातो आहे न समजण्या सारखे आहे. तरी हा भेदभाव आणि सावत्र पणाची वागणूक थांबवावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.
नवी मुंबईच्या जवळच असलेल्या ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये BHMS व BAMS डॉक्टर्स ना सारखेच वेतन मिळते परंतू नवी मुंबई महानगरपालिके मध्ये भेदभाव करुन BHMS डॉक्टरांना कमी वेतन असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले.
या शिष्टमंडळात हिम्पाम महाराष्ट्रचे अध्यक्ष डाॅ.एस.टी.गोसावी, महाराष्ट्रचे सहसचिव तथा हिम्पाम नवी मुंबईचे अध्यक्ष डाॅ.प्रतिक तांबे, नवी मुंबईचे खजिनदार डाॅ.एम.आर.काटकर, डाॅ.प्रशांत आहेर, डाॅ.मुखेडकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here