पोलादपूर : कंटेनरची टँकरला धडक; टँकरचालक गंभीर

0
294

शैलेश पालकर/पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील तीव्र उतारावर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने मुंबईच्या दिशेला जाणार्‍या टँकरला धडक दिली. या अपघातात टँकरचालक केबिनमध्ये अडकून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

या चालकाला वाहतूक पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले. त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रूग्णालयात वैघकीय उपचारासाठी दाखल केले. हा अपघात आज (9 जुलै) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. गंभीर जखमी असलेल्या चालकाचे नाव अरविंद गुप्ता (वय 30) असे आहे. मुंबई – गोवा महामार्गावरुन कंटेनर (क्र.एनएल-01-एडी-7649) हा मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान, कशेडी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून हा कंटेनर समोरून येणार्‍या टँकरवर आदळला. या अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची अद्यापही पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here