तळा : पिटसईकोंड येथील तरुणाला कोरोनाची लागण

0
506

किशोर पितळे/तळा : तळा तालुक्यातील पिटसईकोंड येथील 36 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 23 झाली आहे.

पिटसईकोंड येथील कोरोना बाधित तरुण 4 जुलै रोजी अलिबाग येथे फिजिकल चेकअपसाठी गेला होता. त्यानंतर 7 जुलैपासून त्याला सर्दी, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने 17 जुलै रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी सब अर्बन डायग्नोस्टीक प्रा.ली लॅब येथे पाठविण्यात आला होता. 18 जुलै रोजी त्याचा कोविड-19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. हा रिपोर्ट 20 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे प्राप्त आला. त्यानंतर या रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या नव्या रुग्णामुळे तालुक्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या 23 झाली असून त्यातील 19 जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत तर कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 पॉझिटीव्ह रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. याला रोखण्यासाठी स्वतः प्रयत्न केले तरच लवकर कोरोना मुक्त होऊ शकतो, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, अशी माहिती तळा तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here