कोरोना अपडेट : पोलादपूर शहरात एक, तालुक्यात दोन रुग्ण वाढले

0
427
तालुक्यात चार रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी

शैलेश पालकर / पोलादपूर : तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना महाड व माणगांव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यापैकी चार रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर गुरूवारी सायंकाळी उशिरा पोलादपूर शहरातील सैनिकनगर भागातील एका व्यक्तीची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचा रिपोर्ट प्राप्त झाल्याने एका रूग्णाची भर पडली आहे तर शुक्रवारी दुपारी तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

गेल्या आठवडयामध्ये पोलादपूर तालुक्यातील चरई येथील एक गंगाराम जंगम हा हायपर डायबेटीस आजार असलेला 68 वर्षीय वृध्द मयत झाल्यानंतर तालुक्यात थोडेसे भितीचे वातावरण पसरले असताना शहरातील मठगल्ली भागात एका रूग्णाला उपचारासाठी माणगांव तालुक्यात पाठविण्यात आले. काही दिवस वातावरण चिंतेचे झाले असताना गुरूवारी चार रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. या बातमीने पोलादपूर तालुक्याला दिलासा मिळाला. मात्र, गुरूवारी सायंकाळी पोलादपूर शहरातील सैनिकनगर येथील एका व्यक्तीचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

शुक्रवारी दुपारी पितळवाडी आणि सडवली या दोन गावांतील प्रत्येकी एक व्यक्तीचा कोविड-19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाल्याने आता ग्रामीण भागात पुन्हा सतर्कता वाढीस लागली आहे. याबाबत आयुषचे डॉ.राजेश शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

शुक्रवारपर्यंत तालुक्यातील 76 कोरोना बाधित रुग्णांपैकी 53 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 17 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत तरअशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here