पनवेल महापालिका क्षेत्रात दहा दिवसात कोरोनाने  घेतले 50 बळी

0
370

महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणे समोर मोठे आव्हान

नाना करंजुले/ पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णांचा आकडा 5737 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्के आहे. असे असले तरी या ठिकाणचा मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहा दिवसांमध्ये 50 जणांचा या महामारी  रोगाने बळी घेतला आहे. गोष्ट चिंताजनक असून मृत्यूचा दर शून्यावर आणण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा समोर उभी राहिले आहे.

महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या रोज वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. कामोठे वसाहतीत अत्यावश्यक सेवेमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर बाजूला 2 रेल्वे स्थानक व पनवेल सायन महामार्ग असल्याने सहाजिकच याठिकाणी लोकवस्ती जास्त आहे. परिणामी आतापर्यंत बाराशे  रुग्ण वसाहतीत सापडले. त्यापैकी 36  जणांचा कोरोना महामारी रोगाने बळी घेतला. 15 जुलै रोजी या ठिकाणची रुग्ण संख्या 936 इतकी होती. आणि मृत्यूचा आकडा 26 होता. दहा दिवसात दहा  जणांच्या मृत्यूची नोंद झाली.  कळंबोली वसाहत सुद्धा रुग्णांचा आकडा 1000 पर्यंत आला आहे. या वसाहतीत 26 जणांना आपले प्राण कोरोनाने गमवावे  लागले. दहा दिवसात या वसाहतीसुद्धा दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन पनवेल मध्ये 15 जुलै रोजी  17 मृत्यू झाले होते. हाच आकडा 25 जुलैला 28 वर पोचला.  वास्तविक पाहता अगोदर इतर आजार असल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला. काही रुग्ण उशिरा दवाखान्यात उपचारार्थ दाखल झाले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. यामध्ये काही तरुण रुग्णांनाही समावेश आहे. दरम्यान पनवेल परिसरात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड ची कमतरता आहे.
एकंदरीतच कोरोना विषाणूंचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांच्या आकड्या बरोबर मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. महापालिका प्रशासनासमोर कोरोनामुळे  मृत्यू होऊ नयेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच मनपा हद्दीत चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी केली आहे.
पनवेलमध्ये दहा दिवसात 21 जणांचा मृत्यू
पनवेल शहर आणि आजूबाजूच्या परिसरात 15 जुलै रोजी कोरोना मुळे झालेल्या मृत्यूची संख्या ही सोळा होती. दहा दिवसांमध्ये हा आकडा 37 वर जाऊन पोहोचला. म्हणजे 21 जणांना आपला जीव गमवावा लागला. पनवेल कोरोना डेथ स्पॉट होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याठिकाणी दाटीवाटीची लोकवस्ती आहे. झोपडपट्ट्यांचा समावेश असल्याने येथे कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
खारघर तळोजामध्ये दिलासा
खारघर आणि तळोजात मृत्यूचा आकडा फारसा वाढला नाही. दहा दिवसांपूर्वी अनुक्रमे अकरा आणि दहा ही संख्या होती. ती बारा आणि अकरा झाली. म्हणजे प्रत्येकी एकच बळी या वसाहतींमध्ये गेला. त्यामुळे येथे तरी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोरोना या महामारीमुळे दीडशे पनवेलकरांना आपले प्राण गमवावे लागले. दहा दिवसात पन्नास जणांचा मृत्यू होणे ही गोष्ट अतिशय वेदना आणि दुःखद आहे. किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो बाहेर येण्याचे टाळावे. त्याचबरोबर महापालिकेने उपचाराकरीता अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण कराव्यात जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचतील अशी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसची मागणी आहे.
– सुदाम गोकुळ पाटील, कार्याध्यक्ष- पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here