कोरोना अपडेट : रायगडात आज 432 नवे रुग्ण; 7 जणांचा मृत्यू

0
2455
  • कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 763 वर

  • 212 जणांचा मृत्यू; 4 हजार 291 रुग्ण उपचारानंतर बरे

अलिबाग : रायगडात आज कोरोनाच्या 432 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा 212 वर तर कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 763 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 291 जणांनी कोरोनाला हरवले आहे. सद्यस्थितीत 3 हजार 260 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

आज दिवसातील कोविड बाधित रुग्णसंख्येत पनवेल मनपा-154, पनवेल (ग्रामीण) -40, उरण-10, खालापूर-25, कर्जत-14, पेण – 67, अलिबाग-37, माणगाव-21, रोहा-27, श्रीवर्धन-11, म्हसळा-15, महाड-11 अशी एकूण 432 ने वाढ झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल मनपा 2, कर्जत 1, पेण 2, रोहा 1 आणि म्हसळ्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

त्यातल्या त्या दिलासा देणारी बाब म्हणजे, आज पनवेल मनपा-93, पनवेल ग्रामीण-32, उरण-4, कर्जत-10, पेण-3, अलिबाग-13, माणगाव-5, रोहा-3, श्रीवर्धन-4, महाड-7 अशा 174 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. उपचारानंतर हे रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 291 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात पनवेल मनपा-1 हजार 423, पनवेल ग्रामीण-417, उरण-182, खालापूर-250, कर्जत-97, पेण-304, अलिबाग-205, मुरुड-48, माणगाव-70, तळा-4, रोहा-98, श्रीवर्धन-48, म्हसळा-58, महाड-43, पोलादपूर-13 अशा 3 हजार 260 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनाची चाचणी केलेल्या 236 नागरिकांचे अहवाल प्रलंबित आहेत.

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण – 4 हजार 291

पनवेल मनपा-2 हजार 315, पनवेल ग्रामीण-746, उरण-286, खालापूर-45, कर्जत-147, पेण-119, अलिबाग-153, मुरुड-24, माणगाव-112, तळा-15, रोहा-166, सुधागड-7, श्रीवर्धन-31, म्हसळा-32, महाड-61, पोलादपूर-32 असे एकूण 4 हजार 291 रुग्ण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू – 212

आतापर्यंत पनवेल मनपा-96, पनवेल ग्रामीण-30, उरण-10, खालापूर-10, कर्जत-11, पेण-12, अलिबाग-9, मुरुड-6, माणगाव-2, तळा-2, रोहा-3, सुधागाड-1, श्रीवर्धन-3, म्हसळा-6, महाड-9, पोलादपूर-2 अशा एकूण 212 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here