‘राफेल’ची पाच फायटर विमाने भारतामध्ये दाखल

0
180

२० ऑगस्टला या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश

अंबाला | एकाच वेळी वेगवेगळी कामे करण्याच्या क्षमता, वाघासारखे डरखाळी फोडत तुटून शत्रूच्या अंगावर जाणारा आणि शत्रूला शोधुन शोधून मारणाच्या वैशिष्ट्यामुळे सर्वांचे लक्ष लागुन राहीलेले राफेलची पाच राफेल फायटर विमाने आज भारतात दाखल झाली आहेत.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएएफचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

आयएएफच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर २०१६ साली अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात आली आहेत. लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

अंबाला एअरबेसजवळ १४४ कलम लागू
हरियाणामधील अंबाला हवाई तळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अंबाला जिल्हा प्रशासनाने हवाई तळाजवळ १४४ कलम लागू केलं आहे. यासोबतच फोटो काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्समधून उड्डाण करण्यात आलेली राफेल लढाऊ विमानं बुधवारी भारतात दाखल होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here