बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मार्गदर्शक सूचना

0
166
file photo

शिक्षण विभागाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

अलिबाग : पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आला आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणबाबतचे निर्देश देतानाच शिक्षणाचे स्वरुपही स्पष्ट करण्यात आले आहेत.

राज्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरु करणे शक्य नाहीत. त्यामुळे 15 जून 2020 पासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना दिले आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय 15 जून रोजी जारी करण्यात आला होता.

या शासन निर्णयात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतच्या अंदाजे तारखा देण्यात आल्या होत्या. तसेच त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. आता 22 जुलैच्या या शासन निर्णयानुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याविषयीचे निर्देश शासनाने दिले आहेत.

त्यानुसार, पूर्व प्राथमिकसाठी सोमवार ते शुक्रवार, ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी- प्रत्येक दिवशी 30 मिनिटांपर्यंत, शिक्षणाचे स्वरुप-पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन असे स्वरुप राहणार आहे. इयत्ता पहिली ते दुसरी, सोमवार ते शुक्रवार, ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी- प्रत्येक दिवशी 30 मिनिटांची दोन सत्रे, शिक्षणाचे स्वरुप- त्यापैकी 15 मिनिटे पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन आणि 15 मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण, इयत्ता तिसरी ते आठवी, प्रत्येक दिवशी 45 मिनिटांची दोन सत्रे, शिक्षणाचे स्वरुप-विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, इयत्ता नववी ते बारावी, प्रत्येक दिवशी 45 मिनिटांची चार सत्रे, शिक्षणाचे स्वरुप-विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण असे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here