रायगडात पुढील तीन तास मुसळधार पाऊस; मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचा इशारा

0
3358

अलिबाग : रायगडच्या विविध भागांत पुढील तीन तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून देण्यात आला आहे.

रायगडात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. सलग पडणार्‍या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसाबरोबर जोरदार वारे वाहत असल्याने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. 3 जूनला झालेल्या चक्रीवादळाच्या आठवणी अजून ताज्या असल्याने, नागरिक वादळी वारे वहायला लागले की टेंशनमध्ये येतात. तसाच काहीसा अनुभव रायगडकर गेल्या दोन दिवसांपासून घेत आहेत.

आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने आज (7 जुलै) दुपारी साडेबारा वाजता दिलेल्या इशार्‍यानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अलिबागमध्येही दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here