कर्जत तालुक्यात 18 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

0
801
file photo

तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या पाचशे पार

संतोष पेरणे/ कर्जत । कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. कर्जत तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह आज (31 जुलै) तालुक्यात 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधित रुग्णांची संख्या पाचशे पार म्हणजे 505 वर पोहोचली आहे. यापैकी 379 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, 18 रुग्ण दगावले आहेत.

आज तालुक्याच्या ग्रामीण भागात आठ, कर्जत नगरपरिषद क्षेत्रात नऊ आणि माथेरान नगरपरिषद हद्दीत एक रुग्ण आढळला आहे. यामध्ये मुद्रे बुद्रुकमधील एका इमारतीत राहणार्‍या 49 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून ही व्यक्ती कर्जत तहसीलमध्ये कार्यरत आहे. मुद्रे खुर्दमध्येही एका 40 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली असून हा तरुण विट उत्पादक व बांधकाम साहित्य पुरवठादार आहे. कोतवाल नगरमध्ये एका औषधांचे दुकान चालविणार्‍या 46 वर्षीय व्यक्तीचा, त्याच्या 22 वर्षांच्या पुतणीचा व 17 वर्षीय पुतण्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

कर्जत बाजारपेठेतील दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या 57 वर्षीय पत्नी व 27 वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे. माथेरानमध्ये एका 82 वर्षीय वयस्कर महिला कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. नेरळ नजीकच्या बेकरे गावातील एका 51 वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आली होती. आज तिच्या 19 वर्षीय मुलीचा व 17 वर्षांच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. नेरळमध्ये स्टॅम्प वेंडर विक्रते हे कर्जत-कल्याण रस्त्यानजीक राहणार्‍या एका 51 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. ही व्यक्ती ग्रामपंचायतीची माजी सदस्य असून, सध्या झेरॉक्स सेंटर चालवते. तर शेलू येथील एका 40 वर्षांच्या युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती माजी सरपंच होती व बांधकाम व्यवसायिक आहे.

उमरोली गावातील 60 वर्षीय व्यक्तीला तर भिवपुरी रोड – उकरुळमधील एका 32 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. बीड – नेवळी येथील एका 24 वर्षीय युवकाला आणि कोतवाल नगरमधील एका 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. कोतवालनगरमधील तरुण कपड्याचे दुकान चालवतो. म्हाडा वसाहतीत राहणार्‍या एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती एसटी कर्मचारी आहे. कर्जतमध्ये एका 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत तालुक्यातील 108 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here