नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

0
7650

अलिबाग : नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 50 बेड मर्यादेच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन शनिवार, दि. 25 जुलै 2020 रोजी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.

पालकमंत्री आदिती तटकरे या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्या या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणार असून जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, आमदार भरत गोगावले, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.अभय ससाणे तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

या कोविड केअर सेंटर मध्ये 50 बेडची क्षमता असून कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक जागा भारतीय एज्युकेशनने पुरविली असून रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आवश्यक सोयी-सुविधांनुसार अद्ययावत वैद्यकीय सामुग्री, निष्णात डॉक्टर्स, इतर सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील संपूर्ण कार्यवाही ही शासकीय नियमानुसार होणार असून हे सेंटर पूर्ण करून जनतेच्या सुविधेकरिता शासकीय नियमानुसार जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

नागोठणे शहर रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता हे कोविड केअर सेंटर उपयुक्त ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here