तळा तालुक्यात बाधित पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नी व मुलाला कोरोनाची लागण

0
479

बाधित रुग्णांची संख्या 20 वर; 14 रुग्ण उपचारानंतर बरे

संजय रिकामे/किशोर पितळे/तळा : तळा तालुक्यात आज (10 जुलै) नव्याने 2 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नी आणि आठ महिन्यांच्या बालकाची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली  आहे.

तळा पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई 8 जुलै रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी व मुलगा यांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून, दोघांचीही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्यावर माणगाव लोणेरे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

शहरातील परीटआळी येथील हे कुटुंब वास्तव्यात असलेला परिसर कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तसेच नगरपंचायतीकडून सॅनिटायजरची फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, नगरपंचायत हद्दीत चार रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत 20 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 ठणठणीत बरे झाले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती तळा तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे. तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here