मुरुड : मांडला येथे कोरोना रुग्णाची नोंद; आज तीन रुग्णांची कोरोनावर मात

0
915

तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 143 वर

मुरुड : मुरुड तालुक्यात आज (30 जुलै) कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळून आला आहे. मांडला येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 143 झाली आहे.

आज मांडला येथील 46 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर दिवसभरात तीन रुग्णांची कोरोनावर मात केली. महाळुंगे येथील 65 वर्षीय वृद्ध, मुरुड कोळीवाडा येथील 74 वर्षीय वृद्ध आणि नांदगाव येथील 45 वर्षीय महिला कोरोना मुक्त झाल्याने, या तिघांची रुग्णालयातून सुट्टी झाली आहे.

दरम्यान, आजअखेर मुरुड तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा 143 वर गेला आहे. यापैकी 10 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, 90 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील 43 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती मुरुड तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here