राष्ट्रवादीचे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पदभार स्वीकारला

0
897

अलिबाग : कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. राजकारणातील त्यांचा 35 ते 40 वर्षांच्या कामाचा अनुभव लक्षात घेता, येत्या काळात ते पक्ष संघटना मजबूत करतील, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचीत रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आज (31 जुलै) अलिबाग येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पदभार स्वीकारत, पक्ष संघटनेची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खा.तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे कर्जतचे गटनेते शरद लाड, कर्जत तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, रायगड जिल्हा निरीक्षक तान्हाजी चव्हाण उपस्थित होते.

आज पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी, पुढील काळात सरकारचे निर्णय लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केेला जाईल असे सांगितले. तसेच पक्षवाढीसाठी काम करताना, दर सोमवारी सकाळी साडेअकरा ते दीड या वेळेत कार्यालयात बसून सामान्यांची कामे केली जातील, अशी माहितीही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here