प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पोर्टल धीम्या गतीने सुरु!

0
447
पाली । पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी ताटकळत बसेलेले शेतकरी.
  • ऑनलाईन नोंदणी करतांना अडचणी
  • शेवटचा एक दिवस शिल्लक, बळीराजा हवालदिल

धम्मशिल सावंत/पाली-बेणसे : ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची खरीप हंगामाची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. मात्र पोर्टल धीम्या गतीने चालत असल्याने ऑनलाईन नोंदणी करतांना अनेक अडचणी येत आहेत. त्यात शेवटचा एक दिवस शिल्लक असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

नवनवीन उपक्रम, शासन योजना अंमलात आणण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय दिला असला तरी प्रत्यक्षात सेवा केंद्राच्या संचालकांना याचा मनस्ताप होताना दिसतोय. पोर्टलवर शेतकर्‍यांची ऑनलाईन नोंदणी करतांना सातबारा व क्षेत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र पडताळणी करताना प्रत्येक अर्जासाठी एका सातबार्‍याकरिता किमान 5 ते 10 वेळा प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पिक विम्याचे फॉर्म नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी अर्ज नोंदणीसाठी खूप वेळदेखील लागत आहे.

कृषी विभागामार्फत योजनेची माहिती उशिरा दिल्याने शेवटचे दोन दिवस बाकी असतांना शेतकरी केंद्रावर पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी येत आहेत. मात्र पोर्टलच्या अनिश्चिततेमुळे शेतकर्‍यांचे अर्ज स्वीकारण्यात अडचणी येत आहेत, असे आपले सरकार सेवा केंद्र स्वयंम डिजीटलचे संचालक निलेश शिर्के यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here