करंजाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्र धूळ खात पडून ; हस्तांतरणाच्या प्रक्रिया रखडली

0
345
सिडकोने’च हे आरोग्य केंद्र सुरु करावे,
पनवेल : करंजाडे चिंचपाडा परिसरात नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून तयार आहे. मात्र सिडकोने हे केंद्र जिल्हा परिषदेकडे हस्तांतर करणार आहे. मात्र सिडकोकडून चार पत्र जिल्हा परिषदेला देऊन सुद्धा या केंद्राकडे दुर्लक्षपणा होत असल्याने हा केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे व पोलीस पाटील कुणाल लोंढे यांनी हे आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत.

कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी आणि कामोठे या वसाहतीची निर्मिती सिडकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यानंतर सिडकोने नव्याने एक ते दोन वर्षांपूर्वी करंजाडे वसाहतीची निर्मिती केली आहे. मात्र आजपर्यंत या वसाहतीला सुविधांची वानवा असल्याचे दिसत आहे. यातच करंजाडे वसाहतीमध्ये नवनव्या समस्यां डोकेवर काढत आहेत. यातच सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभारण्यात सिडको व जिल्हा परिषद अपयशी ठरली आहे. करंजाडे वसाहतीमधील नागरिकांना याचा सतत अनुभव येत आहे.
खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घेताना नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे. त्यामुळे सिडकोने सुरवातीलाच येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय करणे अपेक्षित होते. मात्र या सुविधेकडे प्राधिकरणाने दुर्लक्षित केले आहे. नागरिकांच्या गैरसोयीचे गाऱ्हाणे हे जुनेच आहे. दरम्यान या ठिकाणी प्राथमिक केंद्र सुरु करावे हि मागणी यापूर्वीचीच आहे. परंतु याकडे लक्ष न दिल्याने आता कोरोना संकटात अधिक निकड बासू लागली आहे. खाजगी रुग्णालयात सर्दी खोकला आणि साधा ताप असला तरी उपचार दिले जात नाहीत. सर्वच रुग्नांकडे कोरोना च्या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे करंजाडे परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
खाजगी रुग्णालायत उपचार घेणे अनेकांना परवडणारे नाही. विशेष करून अल्प उत्पादन गटातील रहिवाशाना महागडा औषध उपचार घेता येत नाही. या पार्शवभूमीवर करंजाडे परिसरातील सिडकोने बांधकाम केलेले प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सध्या स्थितीत बंद अवस्थेत आहे. हे आरोग्य केंद्र सुरु अशी मागणी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे तसेच पोलीस पाटील कुणाल लोंढे यांनी सिडकोकडे केले आहे.
सिडकोने’ च हे आरोग्य केंद्र सुरु करावे….
सिडकोच्या माध्यमातून करंजाडे परिसरात चिंचपाडा येथे तीन मजली सुसज्ज असे प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्र बांधकाम करून उभारले आहे. मात्र हे केंद्र सिडको जिल्हा परिषदेकडे हस्तान्तरं करणार आहेत. हे आरोग्य केंद्र जिल्हा परिषदे ऐवजी सिडकोच्या माध्यमातूनच सुरु करावे अशी मागणी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केली आहे. जिल्हा परिषदेकडे हे आरोग्य केंद्र हस्तातरण करू नये असे आंग्रे यांनी आहे.

चिंचपाडा करंजाडे परिसरातील सिडकोने बांधकाम केलेले आरोग्य केंद्र अद्याप बंद अस्वस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट पनवेल गाठावे लागते. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु करावे अशी आमची मागणी आहे.  – समीर केणी – विभागीय अध्यक्ष करंजाडे

करंजाडे परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र हे केंद्र जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेला चार ते पाच पत्र दिले आहे. – डॉ. बी. एस बाविस्कर,आरोग्य अधिकारी, सिडको

करंजाडे येथील आरोग्य केंद्राला मी स्वतः भेट दिली आहे. मध्यंतरीत कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे या विषयाकडे लक्ष देता आले नाही. मात्र याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून आठवडाभरात निर्णय घेऊ.
– डॉ. सुधाकर मोरे – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here