कोरोनाशी लढताना पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचे निधन

0
563

सलीम शेख/माणगाव : पोलीस दलातील पालघर जिल्ह्यातील वाळीव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचे कोरोनाशी लढताना रविवारी (26 जुलै) निधन झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी एम.जी.एम. रुग्णालय पनवेल येथे सायंकाळी 4.30 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाणे तसेच माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे. शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत हे ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर माणगाव व गोरेगाव पोलीस ठाणे येथे त्यांना पोलिसांनी श्रध्दांजली अर्पण केली.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांच्या निधनामुळे रायगड, ठाणे, पालघर जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here