खोपटे खाडीत महिलेने मारली उडी; पोलिसांकडून शोध मोहीम सुरु

0
743

जेएनपीटी : उरण तालुक्यातील खोपटे येथील खाडीत विवाहित महिलेने उडी मारल्याची घटना आज (28 जुलै) सकाळी घडली. उण पोलिसांकडून या महिलेची शोध मोहीम सुरु करण्यात आली असून, अद्याप यश आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील सोनारी गावातील विवाहित महिला रोहिणी विश्वनाथ तांडेल (वय 32) ही द्रोणागिरी नोड परिसरात काम करत होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे ती घराबाहेर पडली, मात्र कामावर न जाता तिने थेट खोपटा खाडी पूल गाठला. खाडी पुलावरुन तिने थेट खाडीच्या पाण्यात उडाली घेतली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उरण पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. परंतु अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here